adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बभळाज गावातील लोहार कुटुंबात चंपाषष्ठीचा तडी-भंडारा उत्साहात संपन्न

  बभळाज गावातील लोहार कुटुंबात चंपाषष्ठीचा तडी-भंडारा उत्साहात संपन्न   मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बभळाज...

 बभळाज गावातील लोहार कुटुंबात चंपाषष्ठीचा तडी-भंडारा उत्साहात संपन्न 


 मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बभळाज तालुका शिरपूर लोहार कुटुंबाचे आराध्य दैवत श्री खंडोबा यांच्या चंपाषष्ठीनिमित्त दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी बभळाज येथे पारंपरिक तडी-भंडारा, पाच तळ्यांचे पूजन तसेच विविध धार्मिक विधी अत्यंत भक्तिभावात संपन्न झाले. कै. दामू शंकर लोहार यांच्या समाधीस्थळावर वसलेल्या खंडोबा मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सन २०१०/२०१२ पासून अखंड सुरू असलेली ही परंपरा लोहार समाजात आजही तेवढ्याच निष्ठेने पाळली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाने मणी-मल्ल या दैत्यांचा संहार करून प्रकट झाल्याच्या पौराणिक स्मरणार्थ हा दिवस  सर्व भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

वांगे सेवनाची पारंपरिक सुरुवात चंपाषष्ठीपासून लोहार समाजात वांगे खाण्याची परंपरा सुरू होते. वांग्याची भाजी, भरीत आणि वांग्यावर आधारित पदार्थ याच दिवसापासून घराघरांत बनवले जातात. ही परंपरा आषाढी (कार्तिकी) एकादशीपर्यंत चालते व त्या दिवशी वांगे सेवन थांबवले जाते.

तळी-भंडारा : जेजुरीइतकेच पुण्य :- ज्या भक्तांना जेजुरीला जाणे शक्य होत नाही, त्यांना तळी-भंडारा केल्यास जेजुरीप्रमाणेच पुण्य लाभते अशी श्रद्धा असल्याने या परंपरेला विशेष महत्त्व आहे.

खंडोबाचे 'पाहुणे देव' स्वरूप म्हणून स्थानिक परंपरेनुसार बभळाज येथे विराजमान असलेले खंडोबा हे दैवत पूर्वी अजनाड येथून पाहुणे देव म्हणून आले व लोहार कुटुंबाने त्यांना आपलेसे करत येथेच स्थायिक केले. या दैवताशी कुटुंबाचा आजही अतूट संबंध आहे. 

भक्त अमृतसिंग राजपूत यांची पितळाच्या घंटेची भेट

चंपाषष्ठीच्या शुभ निमित्त गावातील खंडोबा भक्त अमृतसिंग राजपूत यांनी खंडोबा मंदिरास पितळाची घंटा भेट स्वरूपात अर्पण केली. ही भेट मंदिराच्या सेवेत एक महत्त्वपूर्ण भर असल्याचे भाविकांनी व्यक्त केले.

येळकोटच्या जयघोषात वातावरण दुमदुमले

पूजा-विधी दरम्यान "येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. धर्मभावना, उत्साह व आनंदाचे वातावरण कार्यक्रमभर अनुभवास येत होते.

मुख्य पुजारींचे आभार; मंदिर विकासकामे प्रस्तावित

मंदिराचे मुख्य पुजारी व लोहार कुटुंबाचे प्रमुख श्री चंपालाल दामोदर लोहार यांनी भंडारा उधळत सर्व भेटीदार, मान्यवर व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले. मंदिराच्या नव्या सभागृहाचे बांधकाम आता पूर्ण झाले असून, पुढील मूर्ती स्थापना व कळस निर्मितीची कामे प्रस्तावित आहेत.भाविकांच्या सहकार्याने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला. मान्यवरांची उपस्थिती व महाप्रसादास कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सोसायटी सदस्य, महिला मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधीनंतर खंडोबाच्या आवडीचा वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी यांचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला.परंपरेचे जतन करीत लोहार कुटुंबाची ही चिरंतन परंपरा गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करीत असून पुढील पिढ्यांनी तिचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

No comments