adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-  हेमकांत...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, 

स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाले विज्ञान प्रदर्शन. 


विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शैक्षणिक दृष्ट्या सर्वांगीण विकास हा ध्यास जोपासणारी शाळा म्हणजे स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल.शाळेमध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास कशाप्रकारे साधता येईल या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेतर्फे मोठ्या आनंदाने व उत्साहाने करण्यात येते. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 27 नोव्हेंबर 2025, वार गुरुवारी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 


कार्यक्रमाच्या प्रथम चरणात शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर, विज्ञान शाखाप्रमुख राजश्री फेगडे मॅडम, पर्यवेक्षक स्वप्निल सुधाकर चौधरी, कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले शाळेतील विज्ञान शिक्षक, वैभव पाटील, प्रतिमा मोरे मॅडम, रेणुका कोळी मॅडम, माधुरी पाटील मॅडम, यांच्यासह उपस्थितीत मुख्यध्यापकांनी आपल्या सहकाऱ्यांसह  कार्यक्रमाच्या प्रथेनुसार कार्यक्रमाची फीत कापून तथा विद्येची देवता सरस्वती व थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेस सर्वांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करण्यात आल्यात तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला.


या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या जवळ जवळ दीडशे विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विज्ञान जगतातील चित्त वेधक व विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा असंख्य प्रतिकृती म्हणजेच मॉडेल प्रदर्शनात त्यांच्याकडून उत्कृष्टरित्या प्रदर्शित व सादरीकरण करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये  विद्यार्थी दशेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा तथा त्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षाला शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेतर्फे करण्यात येते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अनन्या संदीप चौधरी व कु. राजनंदनी राष्ट्रपाल मोरे यांच्याकडून करण्यात आले.

No comments