सार्वजनिक विद्यालयात संविधान दिन साजरा अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात संविधान दिना निमित्त गावात रॅली काढण्यात आली यावेळी मुख्...
सार्वजनिक विद्यालयात संविधान दिन साजरा 
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात संविधान दिना निमित्त गावात रॅली काढण्यात आली यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात संविधान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम याच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक जीवन सिसोदे यांनी संविधान बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. नंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. जागोजागी विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्या र्थ्यांन साठी प्रश्नमंजुशा हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी 48 विद्यार्थानी त्यामध्ये सहभाग घेतला. मुख्याध्यापक ए जे कदम यांनी प्रश्नमंजुशा विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. उपशिक्षीका शुभांगी देशमुख यांच्या कल्पनेतुन सेल्पी पाईन काढण्यात आला. गावात प्रभात फेरीच्या वेळी अडावद ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी सेल्फी काढल्या या रॅली मध्ये शाकेतील मुख्या ध्यायक ए जे कदम सर्व शिक्षक व शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments