अहिल्यानगर हादरलं विश्वास संपादन करून ७० लाखांची जमीन फसवणूक..! एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमका...
अहिल्यानगर हादरलं विश्वास संपादन करून ७० लाखांची जमीन फसवणूक..! एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२४):-नवनागापूर येथील जमीन खरेदीच्या आमिषाने तब्बल ७० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव गुप्ता येथील चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.फिर्यादींकडून मिळालेल्या माहितीनुसार, बबन बाबुराव गुडगळ, तसेच त्याची तीन मुले दत्ता गुडगळ, छबू गुडगळ आणि शंकर गुडगळ (सर्व रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) यांनी 2022 पासून 28 एप्रिल 2025 या कालावधीत फिर्यादींचा विश्वास संपादन करून नवनागापूर येथील गट क्र. 101/1 अ मधील जमीन खरेदी खत करून देण्याचे आश्वासन दिले होते.या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादींनी वेळोवेळी चेक आणि रोख स्वरूपात एकूण ७० लाख रुपये आरोपींकडे दिले. मात्र दीर्घकाळ लोटूनही ना जमीन खरेदीची प्रक्रिया करण्यात आली, ना कोणतेही खत फिर्यादींना देण्यात आले.खताबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपीनं फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे. अखेर फसवणूक, धमकी व विश्वासघाताच्या आरोपांवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,अद्याप एकाही संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक जाधव करीत आहेत.

No comments