जळगाव जामोद: प्रभाग क्र. ०७ मध्ये भाजपाचा विजयरथ सुसाट! अपर्णाताई कुटे यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पल्लवी हांडक...
जळगाव जामोद: प्रभाग क्र. ०७ मध्ये भाजपाचा विजयरथ सुसाट!
अपर्णाताई कुटे यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद
पल्लवी हांडके पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, भारतीय जनता पार्टीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. नुकताच प्रभाग क्रमांक ०७ मध्ये माजी मंत्री, आमदार संजय कुटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ. अपर्णाताई संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करत आणि फुलांचा वर्षाव करत उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. गणेश दांडगे, नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. सुनिल रघुवंशी आणि सौ. प्रियंका रामेश्वर इंगळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
अजातशत्रू नेतृत्व: श्री. सुनिल रघुवंशी
प्रभाग क्रमांक ०७ मधील भाजपाचे उमेदवार श्री. सुनिल रघुवंशी यांची ओळख एक 'अजातशत्रू' व्यक्तिमत्व अशी आहे. त्यांचा प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक नागरिकाशी थेट 'घर टू घर' संपर्क आहे.

No comments