सातारा जिल्ह्याच्या गोसावी समाज अध्यक्ष पदावर पुन्हा जगन्नाथ गिरी गोसावी यांची नियुक्ती, चांगल्या कामामुळे गोसावी समाजाकडून पुन्हा संधी ! ...
सातारा जिल्ह्याच्या गोसावी समाज अध्यक्ष पदावर पुन्हा जगन्नाथ गिरी गोसावी यांची नियुक्ती, चांगल्या कामामुळे गोसावी समाजाकडून पुन्हा संधी !
माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एखाद्या व्यक्तीबद्दल कौतुक करणे, किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अपुरे पडणारे शब्द हे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत असतं. अशीच ओळख सातारा जिल्ह्यातील दशनाम गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे मा. जगन्नाथ गिरी गोसावी उर्फ (तात्या) यांना पुन्हा दशनाम गोसावी समाज जिल्हा अध्यक्ष पदावर पुढील तीन वर्षाकरिता संधी देण्यात आली आहे. अगदी घराघरात ओळखले जाणारे आणि आपल्या कामाची पोचपावती निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि समाजातील सर्वच प्रसंगात प्रमुख उपस्थिती दर्शवणारे जगन्नाथ गिरी गोसावी यांना ओळखले जाते. पद सत्ता असा कोणताच दुजाभाव न करता जगन्नाथ गिरी गोसावी यांची आज सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांना ओळखले जाते. जगन्नाथ गिरी हे शांतप्रिय स्वयंमी असा त्यांचा स्वभाव आहे. समाजासाठी नेहमीच त्यांचे धडपड दिसून येते. सर्वांना सोबत घेवुन गोसावी समाजातील प्रलंबित प्रश्न देखील त्यांनी यापूर्वीही मार्गी लावली आहेत. आणि त्याच कामाची पोचपावती त्यांनी सर्वांसमोर दाखवली आहे. आज रोजी पुन्हा झालेल्या वार्षिक दशनाम गोसावी समाज या बैठकीमध्ये श्री. दशनाम गोस्वामी मंडळ सातारा जिल्हा मंडळाने नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वच सदस्य कमिटी आणि समाजाकडूंन पुन्हा जगन्नाथ किसनगिरी गोसावी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी तीन वर्षाकरिता पुन्हा निवड करण्यात आली. माननीय श्री. राजेंद्र भारती प्रसिद्ध उद्योजक यांच्याहस्ते जगन्नाथ गिरी गोसावी यांचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सर्वच गोसावी समाजातील बांधवांकडून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनचा वर्षाव करीत शुभेच्छा दिल्या. जगन्नाथ गिरी गोसावी हे आता अध्यक्ष म्हणून पुन्हा तीन वर्षाकरिता राहणार आहेत. यापूर्वी केलेल्या उत्कृंष्ट कामाची पोचपावती घेवुन पुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे इथून पुढेही माझ्या कार्यकाळात समाजासाठी चांगले काम करणार अशी देखील त्यांनी ठाम ग्वाही दिली आहे.

No comments