adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारा पोलिस दलात खांदेपालटची जोरदार मागणी; निवडणुकांनंतर नव्या अधिकाऱ्यांची अपेक्षा !!

 सातारा पोलिस दलात खांदेपालटची जोरदार मागणी; निवडणुकांनंतर नव्या अधिकाऱ्यांची अपेक्षा !!   संभाजी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.  (स...

 सातारा पोलिस दलात खांदेपालटची जोरदार मागणी; निवडणुकांनंतर नव्या अधिकाऱ्यांची अपेक्षा !! 


 संभाजी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्हा पोलीस दलात अद्यापही काही अधिकारी तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यकाळापासूनच संबंधित पोलीस ठाण्यांवर तळ ठोकून आहेत. नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फलटण शहर आणि फलटण ग्रामीण येथेच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असली, तरी इतर ठिकाणी मोठे बदल अद्याप झालेले नाहीत.

मात्र, आगामी निवडणुकांनंतर सातारा जिल्हा पोलीस दलात व्यापक खांदेपालट करण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे समजते. वाठार पोलीस स्टेशन, लोणंद पोलीस ठाणे, मेंढा पोलीस ठाणे तसेच सातारा स्थानिक गुन्हे शाखेत दीर्घकाळापासून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची बदली अद्याप झाली नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवरही सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह संबंधित ठाण्यांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, आणि आगामी निवडणुकांनंतर पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट व्हावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.

No comments