प्रभाग क्रमांक आठ मधून प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड. गोविंदा बारी यांची दमदार एन्ट्री भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल...
प्रभाग क्रमांक आठ मधून प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड. गोविंदा बारी यांची दमदार एन्ट्री
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड. गोविंदा प्रभाकर बारी यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रभागात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. ऍड. गोविंदा बारी हे शांत, मनमिळावू आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. वकील म्हणून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात भक्कम ठसा उमटवला असून गोरगरीब जनतेसाठी ते नेहमी कायदेविषयक मार्गदर्शन करतात. कोर्टामध्ये अल्प शुल्कात सेवा देत न्याय मिळवून देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून गोविंदा बारी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम पाहत असून पक्षनिष्ठ आणि संघटनेप्रती निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक तरुणांना सोबत घेत त्यांनी ग्रामीण आणि अरण्य भागात जाऊन पक्षवर्धनाचे काम देखील केले आहे. यावल वकील संघाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. लोकसंग्रह, जनसंपर्क आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या त्यांच्या तत्परतेमुळे प्रभागात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील बारी वाडा, गुरुवाडा, संभाजी पेठ या भागांत त्यांचा प्रभाव जाणवत असून मतदारांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments