adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभाग क्रमांक १० मधून मेघा कासार यांचा भाजपाच्या नंदा महाजन यांना जाहीर पाठिंबा

  प्रभाग क्रमांक १० मधून मेघा कासार यांचा भाजपाच्या नंदा महाजन यांना जाहीर पाठिंबा  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 प्रभाग क्रमांक १० मधून मेघा कासार यांचा भाजपाच्या नंदा महाजन यांना जाहीर पाठिंबा 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार सौ. मेघा विजय कासार यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. नंदा राजेंद्र महाजन यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्याने स्थानिक राजकारणात मोठी चर्चेला उधाण आले आहे. या पाठिंब्यामुळे नंदा महाजन यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

आज यावल येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षा खडसे, आमदार अमोल दादा जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, सौ. सविता ताई भालेराव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रभाग क्रमांक १० मधील अपक्ष उमेदवार सौ. मेघा कासार यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे भाजप उमेदवार सौ. नंदा महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विजय कासार आणि सौ. मेघा कासार यांचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

No comments