भारतीय लहुजी सेनेचा पुरस्कार वितरण सोहळा ३० नोव्हेंबर ऐवजी ५ डिसेंबर रोजी साजरा होणार ! श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवा...
भारतीय लहुजी सेनेचा पुरस्कार वितरण सोहळा ३० नोव्हेंबर ऐवजी ५ डिसेंबर रोजी साजरा होणार !
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१ व्या जयंती निमित्त दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भारतीय लहूजी सेनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला असून आता दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला,क्रिडा, साहित्य, कला, पत्रकारिता
शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, राजकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यासाठी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी येथील रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सांयकाळी ५ वाजता सदरील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा सर्वांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय सचीव हानिफभाई पठाण, नगर जिल्हाध्यक्ष रज्जाक भाई शेख यांनी केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments