यावल नगरपालिकेची सत्ता मिळाल्यास शहराचा कायापालट करू — ना. गिरीश महाजन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपाल...
यावल नगरपालिकेची सत्ता मिळाल्यास शहराचा कायापालट करू — ना. गिरीश महाजन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास यावल शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दिली. शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपाच्या वतीने आयोजित मेळावा भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिरासमोर घेण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर–यावल विधानसभेचे आमदार अमोल दादा जावळे यांनीही यावल शहराचा सर्वांगीण विकास आमदार निधीतून प्राधान्याने करण्यात येईल, असे सांगितले. मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रोहिणी ताई फेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व उमेदवारांनी या ठिकाणी आपला परिचय करून दिला.यावेळी अक्षय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, भाजपाचे प्रदेश सदस्य हिरालाल दादा चौधरी आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अजानेडकर यांनीही आपली मते मांडली. काही अपक्ष उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून त्यांचा सत्कार नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन भरत पाटील यांनी केले.

No comments