adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विमा संरक्षित केळी पीक पडताळणीसाठी आयुक्तालयातील आले पथक

 विमा संरक्षित केळी पीक पडताळणीसाठी आयुक्तालयातील आले पथक  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ ...

 विमा संरक्षित केळी पीक पडताळणीसाठी आयुक्तालयातील आले पथक 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी २०२५-२६ च्या हंगामात विमा संरक्षण घेतलेल्या क्षेत्राची पीक पडताळणी (जिओ टॅगिंग) सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी २०२५-२६ च्या हंगामात विमा संरक्षण घेतलेल्या क्षेत्राची पीक पडताळणी (जिओ टॅगिंग) सुरू आहे. यासंबंधी भारतीय कृषी विमा कंपनीसह कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विविध भागांत पाहणी केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध गावांत विमा संरक्षित केळी पिकाची कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने तीन पथके तयार करून पडताळणी करत आहेत. यात विजय पांढरे कृषी उपसंचालक प्रदीप भांडलकर उपकृषी अधिकारी ,आकाश निगडे सुशील जाधव मोहन भोसले राजेंद्र खेडकर आयुक्तालय पुणे. तसेच सोमेश देशमुख,भारतीय कृषि विमा कंपनी नाशिक विभाग प्रतिनिधी.सागर पाटील, तालुका प्रतिनिधी चोपडा जिल्हा जळगाव. गौरव बारी कृषी सहाय्यक चोपडा शेतकरी किरण पाटील भूषण पाटील मनोज पाटील आदीं ही पाहणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा  यावल रावेर मुक्ताईनगर येथे करण्यात येत आहे. यात ज्या क्षेत्रात केळी लागवडीसंबंधी विमा संरक्षण घेण्यात आले आहे, त्यात जाऊन पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

जिल्ह्यात केळी पिकासंबंधीची पडताळणी  पाहणीनंतर संबंधित क्षेत्रात जाऊन वरिष्ठ अधिकारी पुन्हा लागवड व अन्य बाबींची खात्री करून घेत आहेत. जिल्ह्यात २०२५-२६ च्या हंगामात सुमारे ९९ हजार शेतकऱ्यांनी एक लाख तीन हजार हेक्टरवर केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेतले आहे. विमा संरक्षित क्षेत्रात वाढ दिसत असल्याने ही पाहणी  सुरू करण्यात आली. लागवडीत मोठी वाढ जिल्ह्यात पूर्वी कांदेबाग (सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या केळी बागा) केळीसह मृग बहर केळीची (जून ते ऑगस्ट या कालावधीत लागवडीच्या बागा) लागवड केली जात होती. पण अलीकडे बारमाही केळी लागवड सुरू आहे. पूर्वीची लागवड दोन्ही हंगामात मिळून ७० ते ७५ हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु केळीला आता रोजगार हमी योजनेत घेतले असल्यामुळे वाढ झालेली दिसत आहे. जलसाठेही मुबलक आहेत. जिल्ह्यातील मुख्य खरीप पीक असलेल्या कापूस पिकाची लागवड रोगराई, कमी दर यामुळे ५० हजार हेक्टरने कमी झाली आहे. ड्रीप इरिगेशन वाढले आहे. केळीची विविध जातिवंत रोपे, वाण आले आहेत. यामुळे केळीची लागवड जिल्ह्यात ८५ ते ९० हजार हेक्टरवर पोहोचली आहे. परिणामी, केळी पिकाच्या विमा संरक्षित क्षेत्रातही मोठी वाढ दिसत आहे, असे जाणकार, कृषी विभागातील मंडळींचे म्हणणे आहे.

No comments