लासुर ता.चोपडा येथिल शेतातुन बोअरवेलची केबल चोरी शेतकरी बोअरवेल केबल चोरीने त्रस्त चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेतकऱ्यां...
लासुर ता.चोपडा येथिल शेतातुन बोअरवेलची केबल चोरी
शेतकरी बोअरवेल केबल चोरीने त्रस्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांचा शेतातील बोअरवेल वरील केबलची व पेटीतील स्टाटर व फ्युजची तोडफोड त्यातील साहित्य चोरट्यांनी चोरून नेले असल्याने शेतकऱ्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन देवून तक्रार दाखल केली असून याबाबत अधिक माहिती अशी की लासूर ता. चोपडा जि. जळगाव येथिल शेतकऱ्यांचा शेतातील बोअरवेल वरील केबल दिनांक : 3/11/2025 च्या रात्री अज्ञात चोरांनी कापून नेल्या आहेत तसेच पेटी मधील स्टाटर व फ्युज तोडफोड करून त्यातील साहित्य चोरून चोरू नेले आहेत सदर प्रकार हा दिनांक 4/11/2015 रोजी सकाळी शेतात गेल्यावर लक्षात आले आहे. तरी असा चोरीचा प्रकार हा दर चार, सहा महिन्यांनी चालु असतो तरी अश्या भुरट्या चोरांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे तर दिलेल्या निवेदनावर शेतकरी बांधवांच्या सह्या केल्या आहेत

No comments