adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिंदु ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २ अंतर्गत चोपडा आगारास तिसरी फेरीचे प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट

 हिंदु ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २ अंतर्गत  चोपडा आगारास तिसरी फेरीचे प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट   चोपडा प्र...

 हिंदु ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २ अंतर्गत 

चोपडा आगारास तिसरी फेरीचे प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.२७) राज्यभर राज्य परीवहन महामंडळाकडुन राबविण्यात येत असलेल्या "हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक" अभियान २ अंतर्गत चोपडा बसस्थानकातील स्वच्छता व बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणा-या विकासाभिमुख उपक्रमांची माहिती मूल्यांकन समितीने घेतली.यात प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी दादाराव गावडे, विभागीय अभियंता धुळे निलेश पाटील सह सर्व्हेक्षणासाठी स्थानिक पत्रकार प्रविण पाटील,पंकज पाटील यांच्या संयुक्त समितीने दिनांक २७ नोव्हेंबर रोजी चोपडा आगारास भेट देवुन संपुर्ण बसस्थानक,आगाराची पाहणी करून सर्वेक्षण केले. चोपडा आगाराचे बदलेले रुप, स्वच्छता, नीटनेटके पणामुळे" महाराष्ट्रात अव्वल असलेला चोपडा आगाराचा हेवा वाटतो व खुपच सुंदर आगार"असे गौरव उदगार काढुन यासाठी मेहनत घेणाऱ्या आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या सह चालक/ वाहक/यांत्रिक व प्रशासकीय कर्मचार्यांचे कौतुक केले.

     यावेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले, यावेळी आगारातील अधिकारी सिध्दार्थ चंदनकर, नितीन सोनवणे, ईश्वर चौधरी,चंद्रभान रायसिंग,सागर सावंत, नरेंद्र जोशी, विजय सोनवणे, संदिप पाटील, रिजवान सैय्यद, सुरक्षा रक्षक कैलास धनगर , संदिप पाटील, रिना पाटील, राजश्री परदेशी, सविता कोळी, वृषाली बैसाणे, निर्मला सोनवणे सह कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार भगवान नायदे यांनी मानले.

No comments