adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे बौद्ध धम्म बाल संस्कार शिबीर समारोप

 चोपडा येथे बौद्ध धम्म बाल संस्कार शिबीर समारोप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा मार्फत पाच दिवस...

 चोपडा येथे बौद्ध धम्म बाल संस्कार शिबीर समारोप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा मार्फत पाच दिवसीय बाल संस्कार शिबीराचा आजचा पाचवा दिवस होता.

      चोपडा येथे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जळगाव जिल्हा पूर्व शाखा अंतर्गत बौध्द धम्म बाल संस्कार शिबिराचे पंचशील नगरात दि. 28 ऑक्टोबर 2025 ते 01 नोव्हेंबर 2025 या पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध धम्मातील 9 ते 15 वयोगटातील बालकांना धम्म संस्काराचे, विविध विधीची माहिती व्हावी यासाठी पाच दिवसात संपूर्ण बौध्द संस्कार विधीचे ज्ञान दिले गेले.आज च्या पाचव्या दिवशी प्रमुख उपस्थित भन्ते थेरोमुनी(बुद्ध गया,बिहार )तसेच भन्ते नागसेन वराड हे उपस्थित होते.भन्ते यांनी उपस्थित शिबिराथी यांना धम्म देसना दिली.यावेळी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य बापूराव गिरधर वाणे, शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, बौद्धचार्य वसंत बाबुराव शिंदे यांनी बौध्द पूजापाठ संस्कार विधी बाबत बाल उपासक व उपासिकानां धम्म देसना व माहिती दिली. या शिबिरात रोज 9 ते 1 यावेळेत विविध विषयावर धम्म देसना देण्यात आले.

         आजच्या पाचव्या दिवशी बौद्धाची आचारसंहिता याविषयी बौध्दचार्य महेंद्र म्हैसरे देसना दिली.शिबिरात मोठया संख्येने सहभागी झालेले 36 बाल संस्कार उपासक व उपासिकानां फलआहार धम्मदाते अनिता कैलास बाविस्कर (पंचशील नगर) तसेच धम्मदाते सुरेखा विकास करनंकाळ,शालिकग्राम करंदीकर, रामचंद्र आखाडे सर, दिपक मेढे सर, जानकीराम सपकाळे यांनी ही फलआहार दिला.

      बौद्धाचार्य.बापूराव वाणेसर, बौद्धचार्य भरत शिरसाठ, बौद्धाचार्य वसंत शिंदे यांच्या हस्ते पाचव्या दिवशी शिबिराचा समारोप संम्पन्न झाला.. अनमोल सहकार्य-बौद्धाचार्य. बापू गिरधर वाने सर, बौद्धाचार्य. सुदाम अप्पा करंनकाळ, शहराध्यक्ष भरत शिरसाठ सर, शालिकग्राम करंदीकर, जानकीराम सपकाळे, रामचंद्र आखाडे सर, संजय साळुंखे सर, सुदाम ईशी, प्रविण करंकाळ, सूरदास अहिरे, समाधान बाविस्कर, अविनाश बाविस्कर, व भारतीय बौद्ध महासभेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बौद्ध शिबीर आयोजनासाठी बौद्धाचार्य.वसंत बाबुराव शिंदे यांनी प्रयत्न केले.

No comments