प्रभाग क्रमांक १०-ब मधून नंदा महाजन यांची प्रचारात दमदार आघाडी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेच्या...
प्रभाग क्रमांक १०-ब मधून नंदा महाजन यांची प्रचारात दमदार आघाडी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०-ब मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. नंदा महाजन व योगेश चौधरी यांनी प्रचाराची गती वाढवून भक्कम आघाडी घेतली आहे. प्रभागातील विविध ठिकाणी दोन्ही उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सौ. नंदा महाजन या भारतीय जनता पार्टीच्या यावल शहर महिला अध्यक्ष असून, महिलांचा मोठा जनसमुदाय त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात त्यांनी प्रभागातील तसेच शहरातील महिलांना मोठ्या संख्येने एकत्र करून मेळाव्याची शान वाढवली.
महिला व नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवणाऱ्या नंदा महाजन यांचे नेतृत्व धाडसी व प्रभावी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल दादा जावळे यांचे त्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात. विधानसभेच्या निवडणुकीत अमोल दादांच्या प्रचारार्थ अनेक महिलांना एकत्र करून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा विचार करून त्यांची भाजप महिला शहराध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच प्रभाग १०-ब मधील अधिकृत उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सौ. नंदाताई महाजन यांचे पती हे व्यावसायिक व शेतकरी असून त्यांचा शेतकरी बांधवांशी घनिष्ठ संपर्क आहे. त्यांचे पुत्र ऋतिक महाजन हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून त्यांचा युवकांमध्ये चांगला संपर्क जुळलेला आहे. या जनसंपर्काचा फायदा नक्कीच नंदाताईंना होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रभागातील नागरिकांमध्ये नंदा महाजन या आगामी निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, अशी जोरदार चर्चा आहे.


No comments