फैजपुर येथे म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथ...
फैजपुर येथे म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. सदरहू कार्यक्रमात शाळेतील श्री एन पी पाटील सर यांनी ७ नोव्हेंबर रोजी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रताप सिंह हायस्कूल राजवाडा चौक जिल्हा सातारा येथे प्रवेश घेतला होता. या शाळेच्या रजिस्टर ला १९९४ या क्रमांकासमोर आजही बाल भिमाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तावेज शासनाने जपून ठेवला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल शाळेत पडल्यामुळेच ते स्वतः शिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे वंचितांचे उद्धार करते ही झाले. आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे शिक्षण हेच उन्नतीचे साधन आहे आणि त्यासाठी आपण आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दिनांक ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. याबद्दल माहिती सांगितली. तसेच विद्यार्थी दिवस या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदवला.
त्याचप्रमाणे दि ७ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या गीताला १५० वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने शाळेतील उपशिक्षक श्री एस नेहते सर यांनी बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम हे गीत अक्षय नवमीच्या रोजी लिहिले आहे. वंदे मातरम ला राष्ट्रगीताप्रमाणेच दर्जा आहे. अशाप्रकारची माहिती दिली. तसेच शाळेत वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच फैजपूर शहर पोलीस स्टेशन येथे जावून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीताचे संपूर्ण सामूहिक गायन करण्यात आले.सदरहू कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक श्री के टी तळले सर आणि पर्यवेक्षक श्री एस ओ सराफ सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्री टी एम चौधरी, जीवन पाटील, वी एम भोई, अखलाक शेख, शिक्षिका नीलिमा वाघुळदे, अनिता सिसोदे, राजश्री महाजन, कल्पना चौधरी, ललिता पाटील, हेमांगी कोल्हे, कविता सराफ यांचे सहकार्य लाभले.

No comments