adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपुरातून दिनदहाडे अपहरण! मारहाण करून निर्जनस्थळी फेकले

 अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपुरातून दिनदहाडे अपहरण! मारहाण करून निर्जनस्थळी फेकले   सचिन मोकळं अहिल्यानगर (सं...

 अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपुरातून दिनदहाडे अपहरण! मारहाण करून निर्जनस्थळी फेकले  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२६):-काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाची धक्कादायक घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी श्रीरामपूर शहरात दिनदहाडे अपहरण करण्यात आले.या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार,सचिन गुजर हे सकाळी त्यांच्या नियमित कामासाठी श्रीरामपूर शहरात आले होते.याचवेळी काही जणांनी त्यांना जबरदस्ती कारमध्ये ढकलून घेत नेले.अपहरणानंतर त्यांना अत्यंत मारहाण करून एका निर्जनस्थळी सोडून देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर तपास यंत्रणा सक्रिय झाली असून अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती गुजर यांना घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर काही संशयितांची ओळख पटवण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

No comments