adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभाग क्रमांक १० (अ) मधून आरोग्यदूत डॉ. युवराज चौधरी प्रमुख दावेदार

प्रभाग क्रमांक १० (अ) मधून आरोग्यदूत डॉ. युवराज चौधरी प्रमुख दावेदार  यावल तालुका प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेच्या ...

प्रभाग क्रमांक १० (अ) मधून आरोग्यदूत डॉ. युवराज चौधरी प्रमुख दावेदार 




यावल तालुका प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 अ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. युवराज विश्वनाथ चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीला प्रभागात मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळत आहे. कोरोना काळात केलेली त्यांच्या कुटुंबाची निस्वार्थ सेवा आजही प्रभागातील नागरिक विसरलेले नाहीत. त्यामुळेच आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. शांत, मनमिळावू स्वभाव आणि सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग ही त्यांची खास ओळख. गोरगरीबांसाठी त्यांच्या दवाखान्याद्वारे सातत्याने निस्वार्थ सेवा देणाऱ्या डॉ. चौधरी यांना प्रभागात मोठा विश्वासार्ह चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांच्या सौभाग्यवती सौ. रेखाताई चौधरी या यापूर्वी नगरसेविका म्हणून याच प्रभागाचे प्रतिनिधित्व केलेले असून त्यांचा अनुभवही डॉ. चौधरी यांच्या मोहिमेस पूरक ठरत आहे.

त्यांचे चिरंजीव डॉ. सागर चौधरी हे देखील युवा नेतृत्व म्हणून परिचित असून रात्री-अपरात्री नागरिकांच्या सेवेसाठी हजर राहतात. पिता-पुत्रांची ही निस्वार्थ सेवा प्रभागात सर्वदूर चर्चेत आहे. याशिवाय त्यांच्या व्याही प्रकाश पुंडलिक चौधरी यांनीही नगरसेवक पद भूषवलेले असल्याने सामाजिक नातेसंबंधातून मिळणारा आधारही त्यांना लाभत आहे. प्रभागातील विठ्ठलवाडी, देशमुख वाडा, कोलते वाडा, धनगरवाडा या भागांत त्यांना चांगला प्रभावक्षेत्र लाभले आहे. नागरिकांमधून मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत होताना दिसत आहे.

 यावल शहराकरीता  डॉ. युवराज चौधरीनीं कोरोना काळातील अतुलनीय सेवा, समर्पण आणि धैर्याबद्दल मनःपूर्वक सन्मान! आपली निस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे.

No comments