adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुयोग शिक्षण मंडळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगाव गडखांब येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 सुयोग शिक्षण मंडळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगाव गडखांब येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न   गडखांब प्रतिनिधी (संपादक -:- ह...

 सुयोग शिक्षण मंडळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगाव गडखांब येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न  


गडखांब प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सुयोग शिक्षण मंडळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगाव गडखांब येथे गुरुवार दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अमोल पाटील , मुख्याध्यापक श्री तुषार बोरसे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. 


प्रदर्शनाचे निरीक्षण मुख्याध्यापक श्री. विठ्ठल पाटील सर, प्रा. शि. सोनाली पवार मॅडम, तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. ए. एस. पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध विज्ञानप्रकल्प, मॉडेल्स व प्रयोग यांना उपस्थित पाहुण्यांनी व शिक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रदर्शनास परिसरातील जि. प. केंद्रशाळा गडखांब जि.प.शाळा नगाव बु., जि.प. शाळा नगाव खु. येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. नवोपक्रम, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी सहकार्य केले

No comments