सार्वजनिक व्यायाम शाळा नायगावचे लोकार्पण नायगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२५, गुरुवार रोजी नायगाव...
सार्वजनिक व्यायाम शाळा नायगावचे लोकार्पण
नायगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२५, गुरुवार रोजी नायगाव गावातील सार्वजनिक व्यायाम शाळेचे उदघाटन नायगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक मा.सौ.नूरजान सर्फराज तडवी (सरपंच,नायगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. गेल्या काही महिन्यांपासून व्यायाम शाळेत आलेल्या साहित्याचे उद्घाटन बाकी असल्यामुळे गावातील तरुणांना व्यायाम सुविधांपासून वंचित रहावे लागत होते. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत योग्य पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज हा उपक्रम प्रत्यक्षात येऊन तरुणांसाठी व्यायामशाळा औपचारिकपणे खुली करण्यात आली.
तरुणांसाठी व्यायाम सुविधा उपलब्ध
आजपासून व्यायाम शाळा सर्व तरुणांसाठी खुली असून शरीरसुदृढता, पोलिस/लष्करी भरती तयारी तसेच एकंदर शारीरिक तंदुरुस्ती यासाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे
गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा
गावातील प्रत्येक युवकांनी या व्यायामशाळेचा लाभ घ्यावा, असे आव्हान ग्रामपंचायत तसेच मनसे विद्यार्थी सेना (मनविसे) जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्या वतीने करण्यात आले.
ग्रामपंचायतीची पुढाकाराने भूमिका
व्यायाम शाळेतील साहित्याची उपलब्धता, जागेची व्यवस्था आणि सुरळीत सुरूवात यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
मनविसेची सातत्यपूर्ण मागणी फलद्रूप
मनविसे पदाधिकारी व स्थानिक तरुणांनी मागील काही महिन्यांपासून व्यायामशाळा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळाले.
मा.सौ.नूरजान सर्फराज तडवी सरपंच, नायगाव,निलेश पाटील (सोनूभाऊ),रामदास पाटील,मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार,अरफान तडवी,सर्फराज तडवी, नागो आण्णा पाटील,श्रीराम कोळी,हर्षल पवार,भिमराव कोळी नायगाव गावातील इतर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदघाटन समारंभ साधा, सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. व्यायामशाळेतील साहित्याची पाहणी करून तरुणांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. व्यायाम शाळा सकाळ-संध्याकाळ या दोन वेळांत ग्रामस्थांसाठी खुली ठेवण्याबाबत निर्णय ग्रामपंचायतीने घेण्यात आला..

No comments