खानदेश उच्चशिक्षित पात्रता प्राध्यापक संघटनेच्या वतीने CHB प्राध्यापकांसाठी ११ महिने कॉन्ट्रॅक्ट नियुक्तीची मागणीचे निवेदन पालकमंत्री गुला...
खानदेश उच्चशिक्षित पात्रता प्राध्यापक संघटनेच्या वतीने CHB प्राध्यापकांसाठी ११ महिने कॉन्ट्रॅक्ट नियुक्तीची मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य)यांना सादर
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ : खानदेश उच्चशिक्षित पात्रता प्राध्यापक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ११ महिने कॉन्ट्रॅक्ट बेसवर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींची नामदार गुलाबराव पाटील(पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री) यांच्यासोबत आश्वासक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री)यांनी प्राध्यापकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक भूमिका घेत, “या प्रश्नांवर शक्य तितके सहकार्य करू,” असे आश्वासन दिले.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
प्राध्यापकांची १०० टक्के भरती तातडीने करावी.
सध्याच्या CHB पद्धतीऐवजी ११ महिने कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियुक्ती करावी.
नियुक्त प्राध्यापकांना दरमहा ₹८०,००० इतके वेतन द्यावे.
संघटनेने स्पष्ट केले की, “शंभर टक्के भरती तत्काळ शक्य नसल्यास, किमान ११ महिने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने प्राध्यापकांची नियुक्ती करावी,” अशी आमची ठाम भूमिका आहे.
या मागणीसंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी पुणे येथील उच्च शिक्षण संचालकांसोबत चर्चेचे पत्र देखील देण्यात आले आहे.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कोळी, उपाध्यक्ष प्रा. विनोद भालेराव, सचिव प्रा. खिलेश पाटील, सदस्य गिरीश सरोदे, प्रा. पंकज फालक, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा रत्नाकर कोळी, प्रा. सुनील अडकमोल, प्रा. रविकांत वासनिक आदी प्राध्यापक उपस्थित होते.

No comments