adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भुईंज पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, स.पो.नि. रमेश गर्जे यांची बदली

 सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भुईंज पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, स.पो.नि. रमेश गर्जे यांची बदली  कु: माधवी गिरी गोसावी ( सात...

 सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भुईंज पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, स.पो.नि. रमेश गर्जे यांची बदली 


कु: माधवी गिरी गोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातारा जिल्हा पोलिस दलातील सातारा पुणे महामार्ग लगत असणाऱ्या भुईंज पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या बदलीनंतर आता पुन्हा एकदा खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती दिसून आली आहे. यामध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मेढा पोलीस ठाण्यात प्रयत्नशील राहणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशावरून भुईंज पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी भुईंज पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला आहे. ताटे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण विभागातील नारायणगांव पोलीस ठाणेसह विविध पोलीस ठाण्यात तसेच विविध पदावर काम पाहिले आहे. तर सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यापासून सातारा स्थानिक गुन्हे शाखा तर मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते. तर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनीही सातारा स्थानिक गुन्हे  शाखेत काम पाहिल्यानंतर त्यांचीही तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यकाळात भुईंज पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनीही भुईंज पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या बदलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे म्हणून प्रभारी अधिकारी मिळाले असून भुईंज पोलीस पोलीस ठाणेला खमक्या अधिकारी मिळाला आहे.

No comments