शिर्डी प्रभाग क्र. ११ मधून किरण कोते हे 'जनसेवा' हेच ध्येय घेऊन सज्ज अजीजभाई शेख / राहाता (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिर्डी नगर...
शिर्डी प्रभाग क्र. ११ मधून किरण कोते हे 'जनसेवा' हेच ध्येय घेऊन सज्ज
अजीजभाई शेख / राहाता
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ११ मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे किरण बाळासाहेब कोते. जनतेत मिसळणारे, कामातून माणुसकी जपणारे आणि विकासाची नवी दिशा दाखविण्याचा निर्धार ठेवणारे किरण कोते हे आज शिर्डीकरांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.
शिर्डीतील सर्वसामान्य लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारे किरण कोते हे समाजकार्यातील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. लोकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण, सर्व वयोगटांतील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विकासकामांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग यामुळे प्रभागातील जनतेचा विश्वास त्यांनी जिंकला आहे.
किरण कोते यांचे उद्दिष्ट केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर शिर्डीचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे. ते ठामपणे म्हणतात, शिर्डी हे साईंचे पवित्र स्थान आहे. हे शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक बनवणे हे माझे पहिले ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविणे आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे. याच ध्येयाअंतर्गत, किरण कोते यांनी पुढील काही वर्षांत शिर्डीमध्ये राबविण्याचे महत्त्वाचे प्रकल्पही नियोजित केले आहेत. यामध्ये प्रत्येक रस्त्यावर उत्तम दिवाबत्ती व्यवस्था करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची सोय उपलब्ध करून देणे, 'हरित शिर्डी' मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण आणि उद्याननिर्मिती करणे, तसेच महिलांसाठी सुरक्षात्मक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
प्रभाग क्र. ११ मधील नागरिक, प्रगतशिल शेतकरी तथा साईबाबा संस्थान कर्मचारी बाळासाहेब कोते पाटील यांचे सुपुत्र किरण कोते यांच्या सेवाभावी वृत्तीवर पूर्ण विश्वास ठेवतात. ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहतात – मग ती सामाजिक, वैयक्तिक किंवा विकासाशी संबंधित समस्या असो. त्यांच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी स्पष्ट दिसते. त्यामुळे नागरिक अभिमानाने म्हणतात, “किरण कोते म्हणजे आपल्या हक्काचा माणूस!”
याच जनविश्वासावर किरण बाळासाहेब कोते म्हणतात, माझ्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, सेवा आहे. जनतेचा आशीर्वाद हेच माझ्या वाटचालीचे बळ आहे. शिर्डीचा सर्वांगीण विकासासाठी वचनबध्द असुन स्वच्छता आणि सौंदर्य अबाधीत राखण्याचा मी दृढनिश्चय केला आहे. त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद उमटत आहे. प्रभाग क्र. ११ मध्ये वातावरण उत्साही आणि सकारात्मक बनले आहे. प्रभाग क्र. ११ मधून किरण बाळासाहेब कोते पाटील हे विकासासाठी वचनबद्ध, असुन सेवा आणि प्रामाणिकतेचा दृढ संकल्प घेऊन जनतेचा खरा प्रतिनिधी म्हणून समोर येत आहेत. याचबरोबर, राज्याचे लोकप्रिय नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तरुण तडफदार माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा भक्कम आशीर्वाद व सक्रिय पाठिंबा किरण कोते यांना लाभला आहे. या राजकीय पाठबळामुळे आणी जनतेचा विश्वास व अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन यांच्या जोरावर शिर्डीमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी किरण बाळासाहेब कोते सज्ज झाले आहेत.

No comments