adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चायना मांजाचा घातक व्यापार एलसीबी कडून उध्वस्त मुद्देमालासह एकजण गजाआड

 चायना मांजाचा घातक व्यापार एलसीबी कडून उध्वस्त मुद्देमालासह एकजण गजाआड  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२...

 चायना मांजाचा घातक व्यापार एलसीबी कडून उध्वस्त मुद्देमालासह एकजण गजाआड 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२):-राज्यात विक्रीस बंदी असलेला,पक्षी-प्राणी तसेच मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा प्लास्टिक व नायलॉनचा चायना मांजा विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कोतवाली हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल 1 लाख 85,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे शहरातील अवैधरित्या चालणाऱ्या चायना मांजा विक्रीवर मोठा अंकुश लागला आहे.पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून शहरात गुप्त तपास सुरू केला होता.या पथकात पोलीस अंमलदार सुनिल पवार,संतोष खैरे,गणेश धोत्रे,शाहिद शेख, दिपक घाटकर,बिरप्पा करमल आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचा समावेश होता.दि.01 डिसेंबर रोजी पथक पेट्रोलिंगवर असताना जी.एल.पी. टॉवर–लिंकरोड केडगाव परिसरात विनानंबर Honda Activa वाहनावर दोन मोठे बॉक्स बांधून जात असलेला एक इसम पोलिसांच्या नजरेस पडला. संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी केली असता त्याचे नाव विशाल कुमार दळवी (वय 30, रा.भुषणनगर, केडगाव) असे असल्याचे समोर आले.पोलिसांनी बॉक्समध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्याने स्वतः कबुली देत सांगितले की, प्लास्टिक व नायलॉनचा चायना मांजा विक्रीसाठी घेऊन जात होता.यानंतर पंचासमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोहेकॉ (492) सुनिल विनायक पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1093/2025 प्रमाणे भा.न्या.सं. 2023 कलम 223, 125 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5,15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या सक्षम पथकाने केली असून नागरिकांकडून या पथकाच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

No comments