adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दारू न दिल्याचा राग जीवावर बेतला..! खुनाच्या प्रयत्नानंतर फरार आरोपीस कोतवाली पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्या

 दारू न दिल्याचा राग जीवावर बेतला..! खुनाच्या प्रयत्नानंतर फरार आरोपीस कोतवाली पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्या   सचिन मोकळं अहिल्यानगर (स...

 दारू न दिल्याचा राग जीवावर बेतला..! खुनाच्या प्रयत्नानंतर फरार आरोपीस कोतवाली पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्या  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२९):-जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून प्रभावी पोलिसी कारवाईचे दर्शन घडविले आहे.दि. 27/12/2025 रोजी रात्री 10.30 ते 10.45 वाजेच्या सुमारास राजगड निवास बायपास रोड, अहिल्यानगर येथे फिर्यादी यांचा मामाचा मुलगा नामे ओंकार हनुमंत गव्हळी (रा.काष्टी ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) यास शिवीगाळ करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.या हल्ल्यात आरोपीने फिर्यादी यांचा मामा यांचा जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून फरार झाला होता.या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 1176/2025 भादंवि 2023 चे कलम 109(1), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ आरोपीस पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोनि.श्री.संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सदर आरोपी हा केडगाव परिसरातील अपोलो टायर शोरूम केडगाव येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हे शोध पथकासह सापळा रचून केडगाव येथील अपोलो टायर शोरूमजवळ आरोपीस रंगेहाथ पकडले. त्यास नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव छोटू उर्फ प्रमोद कुमार ठाकूर (वय 19 वर्षे, रा.समसतीपूर बेलवाडी बिहार) असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी.कुणाल सपकाळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे (यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि.संभाजी गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक फौजदार बोडखे, सहाय्यक फौजदार बनकर, बाळकृष्ण दौंड, महिला पोलीस अंमलदार दरंदले, साबीर शेख, विशाल दळवी, अविनाश वाकचौरे, विजय ठोंबरे, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, अभय कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, अमोल गाडे, सचिन लोळगे, अतुल काजळे, महेश पवार, संकेत धीवर, बडे, आंग्रे, अतुल शेंडे, अतुल लाटे, होमगार्ड सटाणकर मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments