adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल नगरपालिकेला नवी नेतृत्वाची सुरुवात — सौ. छाया अतुल पाटील यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली

  यावल नगरपालिकेला नवी नेतृत्वाची सुरुवात — सौ. छाया अतुल पाटील यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक ...

 यावल नगरपालिकेला नवी नेतृत्वाची सुरुवात —

सौ. छाया अतुल पाटील यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ. छाया अतुल पाटील यांनी आज सोमवारी मोठ्या उत्साहात आपल्या नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावल नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार म्हणून त्यांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर आज अधिकृतरित्या पदग्रहण केले.


या पदग्रहण समारंभास प्रशासनाच्या वतीने सह मुख्याधिकारी रविकांत डांगे व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये

माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना उपनेते संजय सावंत, उपनेता शिवसेना गुलाबराव वाघ, भुसावळचे माजी प्रभारीनगराध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख शरद कोळी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष अन्सार खान, काँग्रेस कमिटी यावल शहराध्यक्ष हकीम शेख, मोहम्मद शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले याकुब यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व विजयी नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. 



नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच नगरपालिकेच्या बाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशे व जोरदार घोषणांनी जल्लोष केला.

यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने नूतन नगराध्यक्ष सौ. छाया पाटील व सर्व विजयी नगरसेवकांसह नगरपालिकेपासून शहरातील प्रमुख मार्गांवरून सवाद्य भव्य जनआशीर्वाद रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप सौ. छाया पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणामुळे यावल शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी नागरिकांमध्ये आशा व्यक्त होत आहे.

No comments