“कॅनरा रोबॅको संभाजीनगर यांच्या सौजन्याने नूतन विद्यालय, मलकापूरमध्ये विद्यार्थ्यांचे ‘सायकलस्वप्न’ साकार!” अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...
“कॅनरा रोबॅको संभाजीनगर यांच्या सौजन्याने नूतन विद्यालय, मलकापूरमध्ये विद्यार्थ्यांचे ‘सायकलस्वप्न’ साकार!”
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नूतन विद्यालय, मलकापूर येथे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड यांच्या वतीने 50 Avon सायकलींचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व ये-जा सुलभ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रदीपभाऊ दिगंबर कोलते, उपाध्यक्ष, लोकसेवा बहुउद्देशीय शिक्षण मंडळ तसेच संचालक मंडळ, मलकापूर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री परेश रमेश भारंबे, म्युच्युअल फंड मॅनेजर, छत्रपती संभाजीनगर, श्री दिपक डिडोळे, व्यवस्थापक, कॅनरा बँक, मलकापूर, तसेच शाळेचे प्राचार्य श्री ए. डी. बोरले, पर्यवेक्षक श्री पी. एस. टेकाडे व श्री सचिन पाटील सर तसेच पालकांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना श्री प्रदीपभाऊ दिगंबर कोलते यांनी सांगितले की, “सायकलमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचून त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी होईल. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांनी कष्ट, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर शिक्षणात यश संपादन करावे. अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते.” प्रमुख अतिथी श्री परेश भारंबे यांनी आरोग्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सायकलींचा वापर करण्याचा सल्ला मार्गदर्शनातून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यू. के. वराडे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. पी. कुंभरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन डी. एस. सपकाळ सर यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून उपस्थित मान्यवरांनी , शिक्षकांनी , पालकांनी ह्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

No comments