थेपडे विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 22 डि...
थेपडे विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी स्वा. सै.पं .ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता. जि. जळगाव येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यात थोर भारतीय गणितज्ञ डॉ.रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या भाषण सादर केले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जी डी बच्छाव सर, उपमुख्याध्यापक एस के भंगाळे सर, शाळेचे पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर शिक्षक प्रतिनिधी एसडी चव्हाण सर, तसेच गणित विषय विभाग प्रमुख श्री.एन.के.अहिरे सर गणित विषय शिकवणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती व्ही एम सूर्यवंशी मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाविषयी गणित विषय मध्ये असणाऱ्या आवडी विषयी त्यांचे विचार सादर केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी केले . कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले..

No comments