आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी! *** पंच देशी दारूवर इंडिगोकारसह एकूण सात लाख 40 हजार रुपयांचा मु...
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी! *** पंच देशी दारूवर इंडिगोकारसह एकूण सात लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !
माधवी गिरी गोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांकडून आपल्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नाकाबंदी दरम्यान हस्तगत करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निवडणुकी कालावधीत अवैधरित्या चालणारे धंदे तसेच दारू विक्री मटका गुटका आशांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तीन रस्ता चौकात नाकाबंदी दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसांनी इंडिकाकार नंबर mh 14 डी. एन 2007 या गाडीला नाकाबंदी दरम्यान चेक केला असता गाडीमध्ये एकूण टॅंगो पंच कंपनीचे दहा बॉक्स दारू मिळून आली इंडिगो कार व ****पंचचे दारू असा एकूण किंमत सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे. वाहन चालक व मालक नामे. विजयकुमार कुलकर्णी रा. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांच्याविरोधांत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
टी.वाय मुजावर
पीएसआय विक्रम वडणे भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले पोलीस हवालदार दीपक भोसले पोलीस हवालदार सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास घाडगे हसन नदाफ पोलीस हवालदार योगीराज खिलारे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे आता पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये देखील अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

No comments