adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अल्काताई रंगदळे यांचा शेगावकर समाजबांधवांकडून जल्लोषात सन्मान भावसार समाजाच्या सूनबाईने गाजवली खामगाव नगरपरिषद !

नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अल्काताई रंगदळे यांचा शेगावकर समाजबांधवांकडून जल्लोषात सन्मान भावसार समाजाच्या सूनबाईने गाजवली खामगाव नगरपरिषद !  ...

नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अल्काताई रंगदळे यांचा शेगावकर समाजबांधवांकडून जल्लोषात सन्मान

भावसार समाजाच्या सूनबाईने गाजवली खामगाव नगरपरिषद ! 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शेगाव- खामगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भावसार समाजाचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष श्री. अनंत (अनंतराव) रंगदळे यांच्या पत्नी सौ. अल्काताई अनंत रंगदळे यांनी घवघवीत आणि बहुमताचा विजय मिळवत नगरसेविकेची खुर्ची दणक्यात पटकावली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे भावसार समाजासह संपूर्ण खामगाव शेगाव परिसरात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दैदिप्यमान विजयाच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथील भावसार समाजाच्या वतीने खामगाव येथील रंगदळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भव्य, उत्स्फूर्त व भावनिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजबांधवांनी फुलहार, शुभेच्या,अभिनंदनाच्या 


वर्षावात नवनिर्वाचित नगरसेविकेचा सन्मान केला. महिला सक्षमीकरणाचा ठळक संदेश सौ. अल्काताई रंगदळे यांचा विजय हा केवळ एक राजकीय यश नसून, तो महिला सक्षमीकरणाचा, सामाजिक जाणीवेचा आणि जनतेच्या विश्वासाचा ठोस कौल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी असलेली त्यांची आपुलकी, सेवाभावी वृत्ती, स्वच्छ प्रतिमा आणि कार्यतत्परता यामुळेच मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला, शुभेच्छा व अभिनंदनाच्या असे यावेळी सांगण्यात आले.या अभिनंदन उपस्थिती लक्षवेधी समारंभाला भावसार समाज जिल्हाध्यक्ष श्री. अनंतराव रंगदळे यांच्यासह मान्यवरांची ठरली समाजातील अनेक ज्येष्ठ व सक्रिय पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष श्री. अजय देविदास अहिर, श्री. संतोष माणिक डीखोळकर, भावसार समाज महिला आघाडी जिल्हाध्यक्षसौ.चेतना गजानन खेते महिला आघाडी शेगाव शहराध्यक्ष सौ.लक्ष्मीताई अजय अहिर, सौ. सोनाली संतोष डीखोळकर,श्री. गजानन शालिग्राम खेते यांच्यासह असंख्य समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "जनतेच्या विश्वासास पात्र ठरणार" सौ. अल्काताई रंगदळे सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अल्काताई रंगदळे यांनी भावसार समाजासह सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. "माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझी जबाबदारी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, महिलांच्या समस्या, युवकांचे प्रश्न, स्वच्छता, पाणी, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी मी ठामपणे आवाज उठवेन आणि प्रामाणिकपणे काम करेन," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भावसार समाजासाठी क्षण अभिमानाचा या विजयामुळे भावसार समाजाला खामगाव नगरपरिषदेत सशक्त, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळाले असून, समाजातील तरुण व महिलांसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याची भावना यावेळी3 उपस्थितांनी व्यक्त केली. सत्कार समारंभातून समाजातील एकोपा, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

No comments