adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्या मंदिरामध्ये पालक सभा संपन्न

बाल संस्कार विद्या मंदिरामध्ये पालक सभा संपन्न  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बाल संस्कार विद्या मंदिरात शाळेचे मु...

बाल संस्कार विद्या मंदिरामध्ये पालक सभा संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बाल संस्कार विद्या मंदिरात शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा संपन्न झाली. सभेत विद्यार्थ्यांचे प्रगती-शैक्षणिक विकास, पालक संवाद , स्पर्धा परीक्षा अडचणी-उपाय, शैक्षणिक सहल, आनंददायी शनिवार व उपस्थिती आणि मूल्य संवर्धन काळाची गरज या विषयावर चर्चा झाली, चर्चेत पालकांनी आपल्या शंका उपस्थित करून आपल्या पाल्याचा शैक्षणिक विकासावर प्रश्नात्मक संवाद साधून चर्चा केली. दिलेल्या विषयावर श्री राजेंद्र फालक सर, प्रशांत महाजन सर, श्री अतुल पवार सर, सौ.सविता वारके मॅडम, श्रीमती सरिता गायकवाड मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले. शाळेचे लिपीक श्री.सुनील श्रावगी  यांनी शासकीय योजनांची माहिती दिली . शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल संस्कार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी सर यांनी सखोल मार्गदर्शन आणि शंकाचे समाधान केले. त्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये व विज्ञानाच्या युगामध्ये ए आय चा वापर कशाप्रकारे होत आहे आणि आपण आपली शाळा कोणत्याच गोष्टींमध्ये मागे नाही याची पालकांना शाश्वती दिली . पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांचे निराकरण केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शिवशंकर सोळंकी सर यांनी केले . कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments