मनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) य...
मनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साकळी केंद्रांतर्गत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भुवनेश्वर माध्यमिक विद्यालय येथील शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष गोपाळ नारायण पाटील आणि विविध कार्यकारी सोसायटी मनवेल चे उपाध्यक्ष, वासुदेव सिताराम पाटील हे होते. त्याचबरोबर मनवेल येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष सीमा कोळी, शिक्षण प्रेमी सदस्य गोकुळ कोळी, सपना कोळी, देविदास कोळी हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित आमचे स्वागत विद्यार्थ्यांनी उत्फूर्त स्वागत गीतांनी केले.
शिक्षण परिषदेमध्ये केंद्रांतर्गत मुख्याध्यापक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवाला. शिक्षण परिषदेचे प्रभावी प्रास्ताविक मनवेल शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता छगन पाटील यांनी केले. यामध्ये सर्वप्रथम साकळी केंद्राचे विशेष शिक्षक भास्कर पाटील यांनी प्रत्येक शाळेतील मागील महिन्यामधील उपक्रमांचा व गुणवत्ता विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. मनवेल शाळेचे शिक्षक प्रवीण पाटील यांनी गटकार्याच्या माध्यमातून माझा वर्ग माझे नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिरसाड शाळेच्या शिक्षिका अर्चना पाटील यांनी सकारात्मक शिस्त तर साकळी कन्या येथील शिक्षिका रूपाली सोनवणे यांनी शाळेतील आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशासकीय बाबींसह इतर परिषदेतील इतर महत्त्वाच्या विषयांवर साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा परिषदेचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मागील महिन्यामध्ये संपन्न झालेल्या शिक्षकांच्या विविध स्पर्धांमध्ये केंद्रातील तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनही करण्यात आले. आभार प्रदर्शन साकळी मुलांच्या शाळेचे समाधान कोळी यांनी तर सूत्रसंचालन मनवेल शाळेचे शिक्षक दीपक चव्हाण यांनी केले. उत्साहवर्धक वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.

No comments