adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पैसा फेको तमाशा देखो राजकारणातील गचाळ कारभार निष्ठावंत कार्यकर्त्यांना रडवण्याचा कारभार

  पैसा फेको तमाशा देखो राजकारणातील गचाळ कारभार निष्ठावंत कार्यकर्त्यांना रडवण्याचा कारभार पैसे फेकले की तिकीट खरेदी करता येते. पण ज्यांनी इत...

 पैसा फेको तमाशा देखो राजकारणातील गचाळ कारभार निष्ठावंत कार्यकर्त्यांना रडवण्याचा कारभार

पैसे फेकले की तिकीट खरेदी करता येते. पण ज्यांनी इतक्या वर्ष घाम गाळून पक्षासाठी कार्य केलेले आहे. त्यांना मात्र बाहेर फेकले जाते. फक्त पैसा टाकायचे आणि तिकीट द्यायचा असा हा राजकारणातला गचाळ व्यवहार चालू आहे. या व्यवहारांमध्ये सामान्य माणूस गुंडाळला जातो. त्यामुळे हवा तसा चांगला नेता ह्या देशाला मिळत नाही. कारण राजकारणामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तेच निष्ठावंत कार्यकर्ते देशाचा विकास घडवू शकतात.पण त्याच कार्यकर्त्यांना डावळून पैशांच्या हव्यास पोटी प्रेमापोटी पैसे घेऊन तिकीट विकली जातात आणि उमेदवार म्हणून त्यांना लढायला ठेवतात.ज्या उमेदवाराला राजकारणातील ग आणि स नाही माहित तो कसा काय देशाचा विकास करू शकेल.ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याला राजकारणातल्या ए टू झेड बातमीची अवगत असते. त्यांना मात्र पक्षाच्या बाहेर फेकले जातं. म्हणजे हा सगळा व्यवहार व खेळ पैशांच्या जोरावरती चालू आहे. या अशा खिसे भरू राजकारणामुळे किंवा राज्यकर्त्यांमुळे आज देशाच्या विकासाला कीड लागलेली आहे. हे नेते आपले स्वतःचे खिसे भरतात. पण निष्ठावंत कार्यकर्त्याला देशाच्या प्रगती पासून दूर ठेवतात.तरुण मुलांनो आणि मुलींनो बायकांनो आता समजून घ्या कसं राजकारण चालू आहे. तुम्ही मुलं मुली तुमचे स्वतःचे काम धंदे टाकून राजकारणाच्या लोकांमध्ये फिरत असता. जो राजकारणी स्वतःच्या  कार्यकर्त्यांशी निष्ठावंत नाही तो आपल्या जनतेशी काय निष्ठावंत राहील याचा विचार करा.देशाचा विकास जर आपल्याला घडवायचा असेल देशाची प्रगती घडवायची असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्याची या समाजाला खरोखर गरज आहे. कारण निष्ठावंत कार्यकर्त्याला जी समाजातल्या दुःखाची तळमळ असते समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाची जी तळमळ असते.ती तळमळ नववधू असणाऱ्या कार्यकर्त्याला नसते.जसा उंदीर या डबक्यातून त्या डब्यात उड्या मारत फिरत असतो. तसे हे राजकारणी नेते सत्तेच्या लोभापाई पैशांच्या लोभापायी हा पक्ष आणि तो पक्ष बदलत असतात. पण यात नुकसान मात्र एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा होतो.तो बिचारा आपलं पूर्ण आयुष्य आपल्या पक्षाच्या कार्य करण्यासाठी घालवतो. फक्त अश्रू आणि निराश त्याच्या वाटेला येते.विचार करा लोकांनो हे राजकारणी लोक किती लबाड आहेत ते. किती स्वार्थ वृत्तीचे आहेत ते . जर ते आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी लबाड गिरी ने वागतात तर आपल्या जनतेशी ते लोक स्वार्थ वृत्तीने लबाड गिरीने का वागू शकत नाही. देशाचा विकास करायचा असेल ना तर निष्ठावंत कार्यकर्त्याचीच गरज आहे. अशा लबाड ढोंगी आणि स्वार्थी नेत्यांची समाजाला गरज नाही.डोळे उघडा आणि पहा आपल्या समाजामध्ये काय घडत आहे ते. या स्वार्थ वृत्तीच्या लबाड वृत्तीच्या नेत्यांच्या मागे तरुण मुलांनी न लागता आपला घर संसार आपल्या आई-वडिलांना पहावे.आपल्याला कशामध्ये रुची आहे त्या रुचीमध्ये पूर्णपणे गुंतून आपला स्वतःचा आपल्या परिवाराचा विकास करावा.पण या ढोंगी लबाड आणि स्वार्थी राजकारणांमध्ये घुसून आपलं आयुष्य आपण बरबाद करू नये. असा हा चिखल फेक व्यवहार ही राजकारणी व्यक्ती करतात आणि ह्या सर्व चिखलफेक व्यवहाराला जबाबदार आपण एक जनता आहोत हे मात्र विसरू नका.... निवडून कोण देतो आपण च त्यांना निवडून देतो. त्यामुळे तुम्हाला ज्यांना निवडून द्यायचा आहे त्या अशा व्यक्तीला निवडून द्या की ज्यांनी आपल्या प्रभागासाठी आपल्या देशासाठी विकास केलेला आहे. म्हणून सर्व ठिकाणी एकच कारभार आहे पैसा फेको और तमाशा देखो और इस देश की वाट लगावो. 


 शब्दांकन लेखिका तृप्ती पाटील मुंबई✍️✍️

No comments