दुर्गा सखी भजनी मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकेचा भिसे यांचा सत्कार अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव:-- दुर्गा सख...
दुर्गा सखी भजनी मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकेचा भिसे यांचा सत्कार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव:-- दुर्गा सखी भजनी मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सुषमा राजेंद्र भिसे यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम दिनांक२९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता दुर्गा माता मंदिर येथे पार पडला हा सत्कार रामकथा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आला होता. दुर्गा माता मंदिर येथे आयोजित रामकथा सप्ताह रामकथा वाचक कल्पनाताई मुकुंदराव देशपांडे (एम. ए. लिटरेचर) यांच्या मधुर वाणीतून दिनांक 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत भक्तिभावपूर्ण
वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी हा विशेष सत्कार समारंभ पार पडला.यावेळी रामकथा सप्ताह ज्या दुर्गा माता मंदिरात संपन्न झाला, त्या मंदिराच्या अध्यक्षा सौ. रीमा संतोष माने यांचाही दुर्गा सखी भजनी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक आनंद अग्रवाल यांचाही सत्कार प्रस्तावित होता, मात्र ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सुबोध पटवर्धन यांनी केले, तर आभारप्रदर्शन संजीवनी गोतमारे यांनी केले. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होते तसेच राजेंद्र भिसे, प्रशांत देशमुख ,सुबोध पटवर्धन, कळमकार सह नागरिकांनी या कथेच श्रवण करीत समाप्ती करिता ठेवलेल्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला

No comments