जे ई स्कूल मुक्ताईनगर चे एक दिवशीय स्काऊट-गाईड शिबिर संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 30/12/20...
जे ई स्कूल मुक्ताईनगर चे एक दिवशीय स्काऊट-गाईड शिबिर संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 30/12/2025 रोजी जे ई स्कूल मुक्ताईनगर मधील नववीच्या स्काऊट गाईड विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाने एक दिवशीय शिबिराचे आयोजन श्री संत मुक्ताई देवस्थान मेहून च्या परिसरात करण्यात आले. या शिबिरात इयत्ता नववीची 41 विद्यार्थी व 41 विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला. शिबिराची सुरुवात सकाळी प्रार्थनेने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त, स्वच्छता, स्वयंसेवा व नेतृत्वगुण यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. विविध खेळ व गटक्रिया आयोजित करण्यात आल्या. शिबिराला स्काऊट गाईड जिल्हा संघटक मा.वैशाली अवथडे मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे नियम, शिस्त,ध्येय तसेच सामाजिक जबाबदारी याविषयी उदबोधन केले. शिबिराला शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चौधरी सर, उपमुख्याध्यापक व्ही के शिर्के मॅडम यांनी उपस्थिती दिली. शिबिराचे आयोजन शाळेच्या उपशिक्षिका एल व्ही पाटील मॅडम, एम एम पाटील मॅडम तसेच उपशिक्षक बी पी लोखंडे सर, एच बी बाऊस्कर सर यांनी केले.या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त,प्रेरणादायी तसेच आनंददायी ठरले.

No comments