adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:- व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेक्रेटरी श्री. रवींद्र पाटील सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आयटीआयचे मुख्याध्यापक श्री. गिरीश वाघुळदे सर व श्री. प्रवीण झोपे सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सेमी माध्यमाच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम, इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम, पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकातून प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांनी शालेय क्रीडा उपक्रमांचा आढावा सादर केला. यानंतर अध्यक्षांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाची मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण झोपे सर यांनी शालेय जीवनातील क्रीडेमुळे मिळणारा उत्साह, आनंद आणि निरोगी राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रभावी शब्दात सांगितले. कार्यक्रमानिमित्त इंग्लिश व सेमी इंग्लिश माध्यमाच्या इयत्ता 6 वी व 7 वीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विशेष म्हणजे, अध्यक्षांनी स्वतः कॅरम व फुटबॉल खेळून क्रीडा दिवसाची सुरुवात करून विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका कुंदा नारखेडे मॅडम व  कविता पाटील मॅडम यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहशिक्षिका प्रीती भार्गव मॅडम यांनी मानले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पडला.

No comments