५२ वर्षानंतर शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत साजरा झाला गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आम...
५२ वर्षानंतर शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत साजरा झाला गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घन:श्याम काशीराम विद्यालयात १९७८–७९ दहावीचे विद्यार्थी तब्बल ५२ वर्षांनंतर आपल्या शाळेत पुन्हा एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा देणारे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनाची सुरुवात बँड पथकाच्या सुमधुर गीताने शाळेच्या गेटमधून वाजत-गाजत तथा फुलांची उधळण करत करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष उमेश पाटील व चेअरमन ललीत महाजन, उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील, कार्यकारणी संचालक यांनी सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीचे स्वागत केले. अनेक वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताना माजी विद्यार्थी भावूक झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून उपस्थितांनी राष्ट्रगीत व “खरा तो एकच धर्म” ही प्रार्थना एकत्रितपणे म्हटली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष के. एच. पाटील सर होते. क्रीडा शिक्षक जी. सी. नेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सावधान व विश्राम घेत कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडली. त्यावेळचे शिक्षक बी. पी. भंगाळे सर व व्ही. टी. जावळे सर उपस्थित होते .
५२ वर्षांनंतर पुन्हा भेटलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे संस्कार व जीवनप्रवासातील अनुभव एकमेकांशी शेअर केले. त्यात मिठाराम सरोदे, रवींद्र पाटील, सुनील महाजन, अरुण पाटील यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. हे स्नेहसंमेलन केवळ भेटीपुरते मर्यादित न राहता, मैत्री, संस्कार आणि कृतज्ञतेची भावना जागवणारा अविस्मरणीय सोहळा ठरला. घ. का. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव बोठे सर यांनी आपल्या शाळेविषयी माहिती दिली. साधारण सर्व विद्यार्थी ६२ ते ६५ या वयोगटातील होते. सूत्रसंचालन प्रा. जयश्री महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिठाराम सरोदे, मनोहर पाटील, निवृत्ती लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

No comments