adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरपीआय आठवले गटाचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामसेवक कारवाई करा -आरपीआय ची मागणी

 आरपीआय आठवले गटाचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण  सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामसेवक कारवाई करा -आरपीआय ची मागणी  शिरपूर प्रतिनिधी  (संपादक -:- हे...

 आरपीआय आठवले गटाचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण

 सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामसेवक कारवाई करा -आरपीआय ची मागणी 


शिरपूर प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर :- तालुक्यातील मौजे करवंद गावातील बौद्ध वस्तीला 2004 मध्ये ग्रामपंचायतने गौतम बुद्ध सेवा मंडळ संचालित नालंदा बुद्ध विहारासाठी 14700 चौरस फूट ( 175 × 84 ) नमुना नं.8 दिलेली असून त्या जागेवर जाणून-बुजून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे, या सांडपाण्यामुळे बौद्ध वस्तीत व बुद्ध विहाराच्या जागेवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे त्या घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत असून बौद्ध विहाराच्या जागेची जाणून बुजून अहवेलना केली जात असून ग्रामपंचायत कडून बुद्धविहाराच्या जागेचा अपमान केला जात आहे.


       तरी बुद्धविहाराची संपूर्ण जागा व बौद्ध वस्ती स्वच्छ करून द्यावी असे अनेक वेळा सांगून देखील ग्रामसेवक व गट विकास अधिकारी पंचायत समिती हे दुर्लक्ष करत असून स्वच्छता करत नसल्याने आरपीआय आठवले गट आक्रमक झाला असून जोपर्यंत बुद्ध विहाराची जागा व बौद्ध वस्तीत स्वच्छता करून ग्रामसेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आज दिनांक 29 डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी आरपीआय आठवले गटाचे एकनाथ रामदास वाघ, विनोद छगन करंकाळ, नर्मदा ताई रघु भील, नरेश गवळे इत्यादी उपोषणकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.

No comments