adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त

 जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमक...

 जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२९):-जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर निर्णायक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.या कारवाईत तब्बल 1,68,960/- रुपये किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांनी दि.28 डिसेंबर 2025 रोजी विशेष पथक तयार केले.या पथकात पोउपनि समीर अभंग,पोलीस अंमलदार ह्रदय घोडके,शामसुंदर जाधव तसेच चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.पथकास जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरम्यान, जामखेड ते नान्नज रोडवरील चुंबळी गावाच्या शिवारात असलेल्या ‘न्यू रशिका हॉटेल’ येथे एक इसम देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकून एका इसमास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव तुषार विठ्ठल जगताप (वय 32), रा. शिवाजीनगर,जामखेड, ता. जामखेड असे सांगितले.

पंचासमक्ष झडती घेतली असता त्या ठिकाणी 44 सिलबंद देशी दारूचे बॉक्स,प्रत्येक बॉक्समध्ये 48 सिलबंद बाटल्या असा एकूण 1,68,960/- रुपये किमतीचा मुद्देमाल सापडून जप्त करण्यात आला.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध पोना/1566 शामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 683/2025 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

No comments