adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव- धुपेश्वर रोडवर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

धरणगाव- धुपेश्वर रोडवर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात   अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मलकापूर...

धरणगाव- धुपेश्वर रोडवर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मलकापूर (दि.२२) - धरणगाव- धुपेश्वर रोडवर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला व यात तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. दरम्यान घडली. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


शहरातील पाच युवक मारुती अर्टीगा गाडी क्र. एमएच १२ जेसी ७५०८ ने धुपेश्वरकडे जात होते. दरम्यान धरणगाव- धुपेश्वर दरम्यान वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये गाडीतील रूद्र उमेश पवार (वय १९) रा.सावजी पैâल व विनायक जनार्धन अत्तरकार (वय २०) रा.लक्ष्मीनगर हे दोघे जागीच ठार झाले. तर यातील गंभीर जखमी गणेश दीपक इंगळे यांचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वनारे, तक्ष धुरंधर या दोन जखमीवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मलकापूर येथून अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तर शहर पोलिस निरीक्षक गणेश गिरी हे सुध्दा पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पोलिस व उपस्थितांच्या मदतीने तातडीने उपचारार्थ मलकापूर येथील रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते.

No comments