बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व समाजोपयोगी जागेसाठी मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपोषण सुरू अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -...
बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व समाजोपयोगी जागेसाठी मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपोषण सुरू
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच पुतळ्यामागील जागा समाजोपयोगी कार्यासाठी (मंगल कार्यालयासाठी) मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक २९ डिसेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे उपोषण तालुकाध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत पूर्णाकृती पुतळा व समाज उपयोगासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने, पूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून प्रत्यक्ष उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
या उपोषणात भीमराव नितुने, सतीश सावळे, संजय वानखेडे, रामभाऊ गवई यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रीतीताई शेगोकार, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, नारायण जाधव उपस्थित होते.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मलकापूर तालुका अध्यक्ष जी. एन. इंगळे, म. ओ. सरकटे, नांदुरा तालुक्याचे उपाध्यक्ष मिलिंदभाऊ जाधव, प्रज्ञावंत तायडे, मोहन शिरसाट, रत्नाकर फुलपगारे, अमोल निकम, बाबुराव वानखेडे, गौतम गवई, सुनील वानखेडे, अरुण होडगरे, अरविंद सोनीने, इलीयाज काझी, विलास तायडे, रघुनाथ पाटील, शेषराव भगत, पंकज मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.महिला आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष पौर्णिमा इंगळे, उपाध्यक्ष रमा होडगारे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments