मौजे दाताळा येथील नळगंगा नदी पात्रामध्ये रहदारीचा रस्ता तथा ह्युम पाईप बॉक्स कल्व्हर्टची ठोस दुरूस्त करा - शिवसेना उबाठा अमोल बावस्कार बुल...
मौजे दाताळा येथील नळगंगा नदी पात्रामध्ये रहदारीचा रस्ता तथा ह्युम पाईप बॉक्स कल्व्हर्टची ठोस दुरूस्त करा - शिवसेना उबाठा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : शिवसेना मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वात मृद व जलसंधारण अधिकारी, बुलढाणा यांना निवेदन. मौजे दाताळा ता. मलकापुर जि. बुलडाणा येथील गावाजवळ नळगंगा नदी पात्रामध्ये २०१९ पाणी नदीपात्रात तुंबल्यामुळे रस्ता बंद झाला होता, हा रस्ता सुरू करण्यासाठी शेतकर्यांनी प्रचंड आंदोलन केल्यानंतर मे २०२३ मध्ये नदीपात्रामध्ये हयुम पाईप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले होते. बांधलेल्या पुलाचे काम हे कमी उंचीचे व त्यामध्ये टाकलेले सिमेंट पाईप हे लहान आकाराचे असल्याने, तसेच फक्त तीन पाईप टाकल्यामुळे, दि. १९ जुलै २०२३ रोजी नळगंगा नदीला आलेल्या पहिल्याच पुरामुळे बांधलेल्या पुलाची लांबी ही नदीपात्राच्या रुंदीपेक्षा कमी असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुंचा ऑप्रोच खरडुन गेल्यामुळे रहदारीचा रस्ता बंद पडला होता. त्याबाबत कार्यालयास दि. २४/०७/२०२३ रोजी तक्रार अर्ज शेतकर्यांनी दिला व समक्ष भेट घेऊन प्रश्न मांडुन त्यावर बरेच वेळा चर्चा केल्यानंतर खरडलेल्या ठिकाणी तेथीलच बाजुची माती खोदुन रस्त्यामध्ये भराव टाकु रस्ता तात्पुरता रहदारीस सुरू करून दिला होता.
वर्ष २०२३ मध्ये टाकलेल्या मातीचा भराव २०२४ च्या पहिल्या पावसात लगेच वाहुन गेला व रस्ता पुर्णपणे बंद पडला होता त्याबाबत देखील कार्यालयास दि. २३/०८/२०२४ रोजी स्मरण पत्र देण्यात आले होते. तरी आज पर्यंत कोणत्याच प्रकारची योग्य ती पक्का रस्त्याबद्दल कारवाई झालेली दिसत नाही किंवा पक्का रस्ता झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकर्यांना शेतीचे अवजारे शेतात नेता येत नसल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीस येवून सुध्दा काढुन त्या मालाला घरी नेता आले नाही. काढणीस आलेला शेत माल हा दि. १२/१०/२०२४ ते दि. १४/१०/२०२४ दरम्यान झालेली अतिवृष्टी च मुसळधार पावसामुळे शेतमाल जागेवरच शेतात खराब झाला तर काही शेतकऱ्यांचे सोयाबिन व मका हे नळगंगा नदीचे पाणी व नदीला आलेले धरणाचे पाणी एकत्र होवुन त्या भागात महापुराचे स्वरूप आल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबिन व मक्का याचे पिक वाहुन गेले होते. या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
सदर नदीपात्रातील रस्त्याची रहदारी ही सुरळीत असती तर काढणीस आलेला शेत माल हा बऱ्या पैकी तयार होवुन शेतकऱ्यांचे नुकसान हे बऱ्या पैकी टाळता आले असते. परंतु मृद व जलसंधारण विभागाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षीतपणामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले व त्यांनी केलेली सोयाबिन व मक्का पिकाची मेहनत व्यर्थ गेलेली आहे.
तेथील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव शेवटी आत्महत्ये शिवाय पर्याय शिल्लक नाही. तरी गांभीर्यपूर्वक विचार करून शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्याकरीता बंद असलेला रस्ता चांगल्या दर्जाचा तत्काळ सुरू करून द्यावा तसेच झालेल्या नुकसानाची, नुकसान भरपाई द्यावी तथा संबंधीत कंत्राटदार व अधिकारी यांच्या वर कठोर कार्यवाही करावी.
अन्यथा ग्रामस्थ व शिवसैनीक हे सदर तीव्र आंदोलन करतील व नंतरच्या परिणामास मृदा व जलसंधारण विभाग जवाबदार राहील.
अशा आशयाचे निवेदन दीपक चांभारे पाटील शिवसेना मलकापूर तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वात मृद व जलसंधारण अधिकारी श्री.अमोलजी मुंडे हे हजर नसल्याने श्री. अमोल जाधव यांच्याकडे देण्यात आले, निवेदन देतेवेळी किशोरसिंह राजपूत, पुरुषोत्तम पाटील, कैलास इंगळे, भगवान नारखेडे, गजानन सुशीर, सुभाष पाटील, प्रवीण तळोले, सोपान नारखेडे, प्रवीण पाचपोर, अतुल सिंह राजपूत, सोपान नारखेडे, निलेश सुशीर, कुलदीपसिंह राजपूत, ज्ञानेश्वर लवंगे व दाताळा व पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments