पुणे स्टँडवर गर्दीत मंगळसूत्र लंपास..कोतवाली पोलिसांनी ४८ तासांत चोरट्याला जेरबंद करत सोनं केलं हस्तगत..! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:...
पुणे स्टँडवर गर्दीत मंगळसूत्र लंपास..कोतवाली पोलिसांनी ४८ तासांत चोरट्याला जेरबंद करत सोनं केलं हस्तगत..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३१):-पुणे स्टँड परिसरात भरदिवसा गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करत चोरलेले ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी श्रीमती रोहीणी गणेश क्षीरसागर (रा.दिघोळ,ता. जामखेड) या आपल्या मुलाच्या घरी कार्यक्रम असल्याने मिरी माका,ता.पाथर्डी येथे गेल्या होत्या.कार्यक्रम आटोपून त्या दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पुणे स्टँड परिसरातून जामखेडकडे जाणाऱ्या वाहनात बसण्यासाठी गेल्या असता, गाडीत मोठी गर्दी होती.याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.या घटनेनंतर फिर्यादीने कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर १०७७/२०२५, बी.एन.एस. कलम ३०२ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासात ही चोरी मंगेश अशोक राखपसरे (वय २५,रा. सलाबतपूर,ता.नेवासा) याने केल्याची खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरलेले ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि. श्री.संभाजी गायकवाड,पोउपनि. श्री.प्रविण पाटील यांच्यासह पोहेकॉ.विशाल दळवी,विनोद बोरगे,बाळासाहेब दौंड,मपोहेकॉ. रोहीणी दरंदले,वसीम पठाण, साबीर शेख,विजय ठोंबरे,पोकॉ. दिपक रोहकले,सत्यम शिंदे,सुरज कदम,अभय कदम,राम हंडाळ, सचिन लोळगे,रिंकु काजळे,अमोल गाडे,दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू यांनी केली आहे.कोतवाली पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक नागरिकांकडून होत आहे.

No comments