सरस्वती विद्या मंदिर यावल येथे २० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
सरस्वती विद्या मंदिर यावल येथे २० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. २७ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. २००५ साली दहावी उत्तीर्ण झालेले ५७ माजी विद्यार्थी व १५ माजी विद्यार्थिनी, तसेच ८ माजी शिक्षक, मुख्याध्यापक आणि १ शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. देशसेवेत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व परस्परांतील मैत्रीचे नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितेश पाटील, हेमंत चौधरी, दुर्गादास कोळी, राहुल बारी, योगेश यावलकर, सचिन गुरव, कन्हैया वाणी, समाधान बारी व इलियास पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून यावल येथील वृद्धाश्रमात २५ ते ३० जणांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती विद्या मंदिर शाळा समितीचे अध्यक्ष श्री. अरुण हरीभाऊ कुलकर्णी सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप इलियास पटेल यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे हा स्नेहमेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

No comments