adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विचखेडे धुपे खुर्दे शिवारात बिबट्याने तीन मेंढ्या केल्या फस्त

 विचखेडे धुपे खुर्दे शिवारात बिबट्याने तीन मेंढ्या केल्या फस्त  विचखेडा ता चोपडा (चंद्रकांत पाटील) (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  विचखेडे धुप...

 विचखेडे धुपे खुर्दे शिवारात बिबट्याने तीन मेंढ्या केल्या फस्त 



विचखेडा ता चोपडा (चंद्रकांत पाटील)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 विचखेडे धुपे खुर्द शिवारातील बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितले बिबट्याने विचखेडा शिवारातील गट नं 31 सुभाष सुकलाल सपकाळे यांच्या शेतातून दोन मेंढ्या व धुपे खु शिवारातील गट नं 65 संतोष गोपाल बोरसे यांच्या शेतातून एक मेंढीचे कोकरू असे तीन मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या याबाबत घटनास्थळी वन विभाग कर्मचाऱ्यांनी मृत तीन मेंढ्यांचे पंचनामे केले तसेच ठसे तपासले असता 



ते ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आले अशा घटनांकडे वन विभागाने कानाडोळा न करता शेती शिवारातील योग्य तो बंदोबस्त राखून वन समित्या माध्यमातून सूचना व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे नागरिकांनी जागरूक राहून गटागटाने शेती शिवारात संपर्कात राहून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे सध्या रब्बी हंगामातील गहू मक्का हरभरा ऊस केळी भेंडी या पिकांना विजेच्या वेळा पत्रका नुसार रात्री बे रात्री पाणी भरणे सुरू असते विचखेडे धुपे खुर्द धुपे बुद्रुक घाडवेल अनवर्दे बुधगाव हातेड आदी भागातील शेतकरी शेतमजूर ग्रामस्थ विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या परिसरातून शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थ यांनी केले आहे 


No comments