श्रीरामपुरात इतिहास घडला! मराठा–राजपूत क्षत्रियांची अभूतपूर्व एकजूट;९ ठोस मागण्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ सचिन मोकळं अहिल्यानगर ...
श्रीरामपुरात इतिहास घडला! मराठा–राजपूत क्षत्रियांची अभूतपूर्व एकजूट;९ ठोस मागण्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१८):-महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात १६ डिसेंबर २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील आणि क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक डॉ.राज शेखावत यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे पार पडलेले ‘मराठा–राजपूत क्षत्रिय महासंमेलन’ हे केवळ एक कार्यक्रम न राहता, नव्या सामाजिक-राजकीय पर्वाची नांदी ठरले.इंग्रजांनी पेरलेल्या चुकीच्या इतिहासामुळे शतकानुशतके दुरावलेले मराठा आणि राजपूत हे दोन क्षत्रिय समाज प्रथमच एका भव्य व्यासपीठावर एकत्र आले. या ऐतिहासिक महासंमेलनाला राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागांतून हजारो कार्यकर्ते, समाजबांधव आणि विचारवंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर ‘क्षत्रिय एकता’, ‘इतिहासाचा पुनर्लेखन’ आणि ‘हक्क व स्वाभिमान’ या घोषणांनी दुमदुमून गेला.महासंमेलनात दोन्ही समाजांच्या एकत्रित ९ प्रमुख मागण्या जाहीर करण्यात आल्या. या मागण्यांनी थेट शासन, प्रशासन आणि प्रस्थापित राजकीय सत्ताकेंद्रांचे लक्ष वेधले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या मागण्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सत्य, आरक्षण, शैक्षणिक व प्रशासकीय हक्क, तसेच क्षत्रिय समाजाच्या स्वाभिमानाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.आपल्या भाषणात डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी सांगितले की, “मराठा आणि राजपूत हे वेगवेगळे नसून एकाच क्षत्रिय परंपरेचे वारसदार आहेत. चुकीच्या इतिहासामुळे निर्माण झालेल्या दरीला आज आम्ही कायमचा पूर्णविराम देत आहोत.”
तर डॉ. राज शेखावत यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले, “या एकजुटीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. हा केवळ सामाजिक नव्हे, तर राजकीय बदलाचा इशारा आहे.”या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी भानुदास वाबळे पाटील,संजय जाधव,महेंद्र निंबाळकर तसेच अहमदाबाद येथील कल्पना चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भव्य उपस्थितीमुळे हे महासंमेलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.मराठा-राजपूत समाजाच्या या विराट एकजुटीमुळे भविष्यातील सामाजिक समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. श्रीरामपूरातून दिलेला हा एकतेचा संदेश आता संपूर्ण राज्यात नवा वादळ निर्माण करणार, यात शंका नाही.

No comments