adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वंचित बहुजन आघाडी तर्फे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन मार्केटयार्ड चौकात जयभीम घोषणांनी परिसर दुमदुमला

 वंचित बहुजन आघाडी तर्फे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन मार्केटयार्ड चौकात जयभीम घोषणांनी परिसर दुमदुमला  सचिन मोकळं अहिल्य...

 वंचित बहुजन आघाडी तर्फे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

मार्केटयार्ड चौकात जयभीम घोषणांनी परिसर दुमदुमला 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.६):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी — अहिल्यानगर दक्षिणतर्फे मार्केट यार्ड चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोहळा मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला. सामाजिक न्याय,समानता आणि बंधुता या बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांचे स्मरण करण्यासाठी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर महासचिव प्रवीण ओरे, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, गणेश राऊत, महादेव नेटके, फैरोज पठाण, प्रतीक ठोकळ, रवींद्र शिरसाठ, संकेत शिंदे, प्रतीक जाधव, शोभाताई आल्हाट,सीमा आल्हाट, संतोष जाधव, अशोक खंडागळे,गौरव आल्हाट,रोहित आल्हाट,प्रवीण धेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा, सामाजिक क्रांतीचा आणि भारतीय राज्यघटनेतील योगदानाचा उल्लेख करत ‘जयभीम!’, ‘भीम अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.उपस्थितांनी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प केला.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे मार्केट यार्ड चौकात अभिवादन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

No comments