देशसेवा ते वनसेवा प्रवास जयप्रकाश सुर्यवंशी यशोगाथा विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर येथील वन विभागात वनपाल म्हणू...
देशसेवा ते वनसेवा प्रवास जयप्रकाश सुर्यवंशी यशोगाथा
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर येथील वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत असलेले श्री जयप्रकाश सूर्यवंशी पाटील आपल्या जीवनकार्यात भारत मातेच्या संरक्षण सेवेत राहून आता वन सेवा करीत आहेत. मुळचे वडजाई तालुका धुळे येथील रहिवाशी जयप्रकाश सूर्यवंशी 25 ऑगस्ट 1993 मध्ये भारतीय सैन्यदलात सिग्नल कोर मध्ये दाखल झाले. जबलपूर व गोवा राज्यातील फोंडा येथे त्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतले. दूर संवाद साधने व प्रत्यक्षात युद्धात सहभागी होणे या पदावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. जुलै 1999 मध्ये कारगिल युद्धात सुद्धा ते सहभागी झाले. कारगिलच्या भयानक युद्धात डोक्यात घातलेल्या हेल्मेट वरून गोळी छेदून त्यांच्या खांद्यातून आरपार गेली. कंधार येथील भारतीय विमानांच्या अपहरणाच्या वेळी 24 /12/ 1999 रोजी त्यांची कंधार साठी निवड झाली होती. अहमदाबाद मधील अक्षरधाम वर 2002 मध्ये अतिरेक्यांनी केलेला हल्ला परतून लावण्यासाठी रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या चमूने अतिरेक्यांना हूसकावून लावले .त्यावेळी आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते .त्यांनी आपल्या या जवानांना रक्षाबंधनच्या दिवशी चांदीच्या राख्या पाठवल्या असे सूर्यवंशी साहेब अभिमानाने सांगतात. कर्नाटक व तामिळनाडू सरकारच्या विनंतीनुसार हस्तिदंत व चंदन तस्कर वीरप्पनला पकडण्यासाठी पथकात 2003 मध्ये जयप्रकाश सूर्यवंशी यांची निवड झाली होती. निवड होण्याअगोदर विषारी साप, विंचू व काटे यांच्या जीवघेण्या चाचण्यातून आम्हाला कसे सामोरे जावे लागले त्यांचा अनुभव थरकाप उडवणारा होता. 26/11 मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ला परतून लावण्यासाठी जयप्रकाश सूर्यवंशी यांचे ही योगदान आहे. त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात पठाणकोट ,बरेली अरुणाचल प्रदेश ,(चायना बॉर्डर), नागपूर या क्षेत्रात त्यांनी आपले कर्तव्य बजावले. सूर्यवंशी 2008 मध्ये सैनिकी सेवेतून निवृत्त झाले व 2009 मध्ये ते नंदुरबार विभागातील वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून भरती झाले. नेवासी, तळोदा, अक्कलकुवा व खापर या ठिकाणी त्यांनी आपले काम केल्यावर अक्कलकुवा येथे वनपाल पदावर त्यांची नियुक्ती झाली. पाल तालुका रावेर येथे वनपालाचे प्रशिक्षण सुरू असताना लंगडा आंबा येथे जंगलतोडीला आळा घालण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांनी हुसकावून लावले. जयप्रकाश सूर्यवंशी आपल्या कामाला महत्त्व देतात. लासुर वनपाल म्हणून सकाळीच उठून ते सर्व गार्ड कर्मचारी यांना कामाचे नियोजन देऊन स्वतः आपल्या विभागात वनात फिरस्तीला निघून जातात. आपल्या लष्करी सेवेततील अनुभव असल्यामुळे वनसेवेत आपल्याला त्याचे खूपच महत्त्व जाणवते .आपल्याला वरिष्ठाचे खूप सहकार्य लाभते असे त्यांनी सांगितले .जयप्रकाश सूर्यवंशी यांचा मोठा मुलगा व सुनबाई शासकीय वैद्यकीय सेवेत डॉक्टर आहेत. लहान मुलगा बेल कंपनीत मोठ्या पदावर आहे .आपल्या वन विभागावर ते निस्सीम प्रेम करतात. वने टिकायला पाहिजेत,झाडे जगायला पाहिजे म्हणून ते अहोरात्र प्रयत्न करतात.
शब्दांकन
देविलाल बाविस्कर
सेवानिवृत्त मुख्याध्यापक व माजी सरपंच लासुर ता चोपडा

No comments