जिल्हा परिषद शाळा कमळगाव येथे आनंददायी दप्तरमुक्त शनिवारी उत्सवात साजरा संगीतमय कवायत करतांना जि प शाळा कमळगाव येथील विद्यार्थी व शिक्षक ...
जिल्हा परिषद शाळा कमळगाव येथे आनंददायी दप्तरमुक्त शनिवारी उत्सवात साजरा 
संगीतमय कवायत करतांना जि प शाळा कमळगाव येथील विद्यार्थी व शिक्षक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकताच जि प शाळा कमळगाव शाळेत शालेय शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी आनंददायी शनिवार साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहेत यामध्ये दप्तरमुक्त शनिवार अर्तंगत विद्यार्थ्यांचा नवनिर्मिती व चिकित्सक भावना वाढविण्यासाठी सामुहिक कवायत, मातीपासून वस्तू निर्मिती, कागद काम करून प्राण्यांची मुखवटे तयार करणे संगीतमय कवायत सादर करणे यासारखे विविध उपक्रम जि प शाळा कमळगाव येथे दर शनिवारी साजरे केले जातात यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक केवलदास महाजन, भास्कर पाटील, रमेश शिरसाठ, महेश पाटील, समाधान बोरसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात
No comments